बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच अडकणार विवाहबंधनात

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच अडकणार विवाहबंधनात

अनेक सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकणार या चर्चेनंतर आता बॅडमिंटनपटू सायना नेहवाल विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे.

येत्या 16 डिसेंबरला सायना आणि पी.कश्यप लग्न करणार असून लग्नानंतर 5 दिवसांनी रिसेप्शन सोहळ्याच आयोजन करण्यात येणार आहे.

या दोन्ही खेळाडूंच्या घरी लग्नाची जोरदार तयारीदेखील सुरू झाली आहे.

हा विवाहसोहळा मोजक्याचं पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असून केवळ 100 जणांना आमंत्रण देण्यात येणार आहे.

लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शन सोहळ्याला मित्र-मंडळी, क्रीडा आणि चित्रपट जगातातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सायानानं पी.कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता, तेव्हापासूनचं या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांनी अनेक तर्क लढवण्यास सुरुवात केली होती.

या दोघांनीही आपलं नातं कधी लपवलं नाही, मात्र आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा देखील दिला नव्हता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version