जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थींनी केला होता. मात्र, या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण एमआयटी संस्थेकडून करण्यात आलाय.
सर्व विद्यार्थिनींची तपासणी शिक्षण मंडळाने नेमलेल्या कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या उपस्थितीत होत होती आणि कोणत्याही मुलीची चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यात आली नाही असेही संस्थेनी म्हटलय. त्याचबरोबर तक्रर देणाऱ्या मुलीने तीन दिवसांनतर तक्रर का दिली असा सवालही एमआयटी संस्थेने उपस्थित केला आहे. एम आय टी कोलेजमधील परिक्षा केंद्रावर, परिक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडुन त्यांच्या पाल्यांना कोपी करु दिली जावी, यासाठी संस्थेतील शिक्षकांना दमदाटी केली जात होती, दबाव टाकला जात होता असा आरोपही संस्थेने केलाय.
या दबावाला बळी न पडल्याने संस्थेवर असे आरोप केले जात असल्याचं संस्थेने म्हटलय. यावेळी एम आय टी संस्थेकडुन संबंधीत परिक्षा केंद्रावर पकडल्या गेलेल्या कोप्यांचा ढीगचं पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. त्याचबरोबर उरलेले पेपर झाल्यानंतर परिक्षा केंद्र इथून हलवाव अशी विनंती परिक्षा मंडळाकडे केल्याच एम आय टी मंडळाने म्हटलय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.