ही 1 कोटींची मंडई आहे विक्रेत्यांच्या प्रतिक्षेत

ही 1 कोटींची मंडई आहे विक्रेत्यांच्या प्रतिक्षेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर बदलापुरात फेरीवाले, भाजीविक्रेते यांना स्टेशन परिसरात बसू दिलं जात नाहीये. त्यांच्यावर कारवाई केली जातेय. तर दुसरीकडे त्यांना त्यांच्याचसाठी बांधलेल्या मंडईचाही ताबा दिला जात नाही. त्यामुळे फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं बदलापुरात आंदोलन केलंय. पालिकेच्या धूळ खात बंद पडलेल्या मंडईसमोर भाजी विकून हे आंदोलन करण्यात आलंय. बदलापूर पालिकेनं बांधलेल्या या मंडईचा ताबा लवकरात लवकर देण्यात यावा. अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी आणि फेरीवाल्यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version