बच्चू कडूंसह अनेक कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

बच्चू कडूंसह अनेक कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तसेच न्याय्य हक्कांसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा गुजरात-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी रोखली.

 

त्यानंतर आमदार बच्चू कडूंसह अनेक कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले. नवापूरजवळ नंदुरबार पोलिसांनी ही यात्रा रोखली.

 

नागपुरातून 11 एप्रिलला निघालेली ही आसूड यात्रा 21 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात धडकणार होती.

 

सीएम टू पीएम होम आंदोलनाच्या नावाखाली असलेली ही आसूड रोखल्याने आक्रमक आंदोलकांनी घोषणाबाजीसुद्धा केली.

 

यावेळी गुजरात बॉर्डरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळाला.

 

बच्चू कडूंच्या आसूड यात्रेला समर्थन देण्याकरता गुजरातची किसान संघटनासुद्धा गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दाखल झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version