जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात घोषित झालेली कर्जमाफी फसवी असून यातील नियम आणि अटी पाहता शेतकारी समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला.
मुख्यमंत्री अभ्यास फार करतात पण त्याचा फरक काही दिसून येत नाही. अशी घणाघाती टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.
येत्या 23 तारखेनंतर पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरणार असून स्वामिनाथ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत सुकाणू समिती शांत बसणार नसल्याचं कडू यांनी
म्हटले.
तसेच तूर खरेदीबाबत सरकारी गोंधळ पाहता 22 जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास पालकमंत्रीच्या घरात तूर फेको आंदोलन करण्यात येईल असं सुकाणू समितीचे सदस्य
बच्चू कडू यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.