…तर मी 20 हजार रुपयांचे बक्षीस देईन; आमदार बच्चू कडूंनी साधला बांधकाममंत्र्यांवर निशाणा

…तर मी 20 हजार रुपयांचे बक्षीस देईन; आमदार बच्चू कडूंनी साधला बांधकाममंत्र्यांवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रस्त्यांच्या खड्डयांवरुन आमदार बच्चू कडू यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट केलं आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात राज्यातील रस्त्यावर खड्डे दाखवा आणि एक हजार रूपये बक्षिस मिळवा अशी घोषणा केली होती. परंतु मंत्र्याची ही घोषणा हवेतच

राहिल्याची टीका करत टेंभूर्णी ते अहमदनगर राज्यमहामार्गावरील खड्ड्यांचा दाखला दिला आहे.

 

टेंभुर्णी ते अहमदनगर या 60 किलोमीटर राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे पाच वर्षांपासून काम सुरु आहे. हे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने ठिकठिकाणी

रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत असून. या रस्त्यांवरचा प्रवास अनेकांच्या जीवावरसुद्धा बेतला आहे हाच धागा पकडत बिगर खड्ड्याचा अहमदनगर ते  टेंभूर्णी

रस्ता दाखवा आम्ही चंद्रकांत पाटील यांना वीस हजार रुपयांचे बक्षिस देऊ अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version