शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडूंचा जिल्हा बँकांवर गंभीर आरोप

शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडूंचा जिल्हा बँकांवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच भडकलेयेत. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका नसल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय.

शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा घेत त्यांच्या नावावर कर्ज देण्याचा प्रकार जिल्हा बँकांनी चालवला असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय.

सहकार मंत्र्यांच्या मतदार संघात त्यांच्याच कारखान्यांनी हा प्रकार केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. जर कुंपणच शेत खात आहे शेतकरी कोणाकडे तक्रार करणार अशी उपहासात्मक टीका बच्चू कडूंनी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version