आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज,अमरावती

अमरावती च्या आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये आमदार बच्चु कडू वर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.

2014च्या निवडणूक लढविताना त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली नाही या कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मुंबईमधील 42 लाखांचा फ्लॅट असतांना, या फ्लॅटची माहिती निवडणूक आयोगाकडे दिली नाही, यामुळे आमदार कडू यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपविल्या कारणाने चांदुर रेल्वेचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आसेगाव पोलिसात तक्रार दिली आहे.

यांच्या तक्रारी वरून आसेगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, न्यायालयाच्या परवानगी नुसार पोलीस पुढील चोकशी करतील, अशी माहिती मिळाली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version