जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर 2017 कालावधीत जन्म झालेल्या 301 कन्यारत्नांचा सामुहिक नामकरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. या नामकरण सोहळ्यात मुलींच्या मातांचाही फेटा बांधून गौरव करण्यात आला.
त्यासोबतचं साडीचा आहेर आणि कन्यांसाठी पैंजन, पाळणा आणि नामकरणासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत दिले. स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 14 व्या राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात हा कार्यक्रम आयोजित केलाय.
कीर्तन महोत्सवात गेल्यावर्षापासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानातंर्गत नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत जन्मलेल्या कन्यारत्नांचा ‘सामुहिक बारशाचा सोहळा’ आयोजीत केला.
गतवर्षी या पहिल्याच सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मागील वर्षी जवळपास 250 कन्यारत्नांचे सामुहिक नामकरण करण्यात आले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.