बाबू उठ ना; उल्हासनगरमधील काळीज चिरत जाणारं, डोळ्यांतही पाणी आणणारं हृदयद्रावक दृश्य

बाबू उठ ना; उल्हासनगरमधील काळीज चिरत जाणारं, डोळ्यांतही पाणी आणणारं हृदयद्रावक दृश्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धाय मोकलून रडणारा बाप.. आणि हॉस्पिटलमध्ये निष्प्राण पडलेला तो चिमुरडा.. बाबू उठ ना असा उमटलेला आक्रोश.. काळीज चिरत जाणारं, डोळ्यांतही पाणी आणणारं

हे हृदयद्रावक दृश्य.

 

लहान मुलं म्हणजे घरातलं हसतं खेळतं चैतन्य. अगदी निरागस फुलांसारखी. पण याच चिमुरड्यांचे बळी जात आहे. तेही नालायक प्रशासनामुळे.

 

दोन दिवसात नाल्यात पडून दोन चिमुरड्यांचे बळी गेले आहेत. दोन घरातला फक्त आक्रोश आणि संताप दिसतोय.

 

इथल्या घरांमध्ये फक्त हंबरडा ऐकू येत आहे. उल्हासनगरच्या स्केशन 28 मध्ये राहणारा साहिल शिंदे. तर, उल्हासनगरमध्येच राहणारा आणखी एक चिमुरडा गणेश

जैसवाल दोघांचाही मृत्यू नाल्यात बुडून तोही उल्हासनगरमध्येच.

 

दोन दिवसात दोन मुलांचे मृत्यू झाले तरीही प्रशासन ढिम्मच. या निरागस मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण. या मुलांचा दोष तरी काय होता. कोवळं निरागस आयुष्य

अकाली संपलं याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version