जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती आज ठाण्यात उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठाण्यातील कोर्ट नाका येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रात्री 12 च्या सुमारास शेकडो अनुयायांनी अभिवादन केले.
यावेळी ठाण्यातील शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने अमेरिका येथून आलेल्या बौद्ध भिकुन्नी क्रांती खेमा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वेळी बुद्ध वंदना देखील बोलण्यात आली. असंख्य अनुयायांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.