बाबा सिद्दीकींना वांद्रेचा झोपडपट्टी घोटाळा भोवणार; ईडीच्या ऑफिसमध्ये बाबा सिद्दीकींची चौकशी

बाबा सिद्दीकींना वांद्रेचा झोपडपट्टी घोटाळा भोवणार; ईडीच्या ऑफिसमध्ये बाबा सिद्दीकींची चौकशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाबा सिद्दीकींवर करण्यात आला.

 

याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच इडीने अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या पाच कार्यालयांवर छापे मारले

होते.

 

यातून काही महत्त्वाची कागदपत्रं ईडीच्या हाती लागली असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती इडीच्या अधिका-यांनी दिली. तर, बाबा सिद्दीकी यांना इडीने चौकशी

रता बोलावले होते.

 

त्यानुसार बाबा सिद्दीकी यांची चौकशी इडीचे अधिकारी करत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एखाद्या भूखंडाचा विकास करायचा असेल, तर त्या भूखंडाचा काही

भाग झोपडपट्टीधारकांसाठी सोडून द्यावा लागतो.

 

मात्र, हे करताना सिद्दिकी आणि मकबूल कुरेशी यानं संगनमतानं बनावट कागदपत्रे बनविल्याचा आणि त्या माध्यमातून सुमारे 100 ते 400 कोटींचा घोटाळा केला असा

आरोप करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version