लॉकडाऊन दरम्यान लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलंय. पोलीस यंत्रणा याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस लोकांना रस्त्यावर फिरू देत नाहीत. मात्र काही टवाळखोर पोलिसांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. काही समाजकंटक तर त्यांच्यावर हल्ला देखील करत आहेत. एका पोलिसाचा हातच कापल्याची संतापजनक घटनादेखील घडली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर अभिनेता आय़ुषमान खुराना संतापला आहे.
आय़ुषमानने ट्विटरवरून पोलिसांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जे पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. जे आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून ड्युटी करत आहेत, त्यांचा सर्व भारतीयांनी सन्मान करायला हवा, अशी भावना आयुषमान खुराना याने व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.