अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण

अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण

कळवा, १७ जून २०२३, प्रतिनिधी : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आयोध्या पौळ यांना शाई फेक करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातल्या कळवा येथे ही घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद वाढण्याची शक्यता आहे. अयोध्या पौळ एका कार्यक्रमासाठी कळव्यात होत्या. त्यावेळी त्यांना काही जणांनी घेरले आणि शाई फेकली. केवळ शाईफेक नाही तर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version