अशोक सराफांना पुरस्कार प्रदान

अशोक सराफांना पुरस्कार प्रदान

पुणे, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि जेष्ठ रंगकर्मी अशोकमामा म्हणजेच अशोक सराफ. सहजपणे अभिनय करणे हा त्यांचा गुण. मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर ते कायमच अधिराज्य गाजवतात. त्यांना विनोदाचा बादशाह, विनोदवीर म्हंटले जाते.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जेष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तसेच पुण्याचे पालकमंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version