औगंबादमधील कचराकोंडी सोडवण्यासाठी नागरिकांची टीम तयार

औगंबादमधील कचराकोंडी सोडवण्यासाठी नागरिकांची टीम तयार

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील कचराकोंडी दूर करण्यासाठी आता नागरिकांनीच एक पाऊल पुढे टाकल आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक फोरम (नागरिकांची टीम) तयार करण्यात आली आहे. त्यातून शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये नागरिकांनी एकत्र येत महापालिकेला मदत करण्याचा ठरवलंय. कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेची चूक असली तरी आता प्रश्न गंभीर झाला आहे. यावेळी औरंगाबादकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत एक पाऊल पुढे टाकल आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडवणे सगळ्यांचे कर्तव्य असल्याचं मत एकत्र आलेल्या औरंगाबादकरांनी व्यक्त केलंय.

औरंगाबादकर आता एक टीम बनवून ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणार आहे. नागरिकांचीही जबाबदारी शहर स्वच्छ ठेवण्याची आहे. त्यामुळं त्यांनीही आता शहर घाण होणार नाही याची काळजी घेण्याची आवाहन ही नागरिकांचे हे फोरम करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version