जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वरून नवा वाद निर्माण झालाय. शिवजयंती उत्सव समिती आणि महानगरपालिकेत वाद पेटलाय.
या वादात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी उडी घेतल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. गेल्या पाच वर्षांपासून महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी होतंय.
असं असताना पालिका कोणतेही पाऊल टाकत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान या कार्यकर्त्यांनी थेट पालिकेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत पालिका प्रशासनाचा निषेध केलाय.
पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी पालिकेकडे पैसे नसल्यास मराठा क्रांती मोर्चाला केवळ एनओसी द्या, आम्ही काम करु अशी मागणीही मोर्चाचे समन्वयक विनोद पाटलांनी केलीय.
येत्या 19 फेब्रुवारीला कामाचा शुभारंभ पालिकेनं न केल्यास आम्ही करु, असा अल्टिमेटही त्यांनी दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.