औरंगाबादच्या महापालिकेत गोंधळ; तीन नगरसेवकांचे पद रद्द

औरंगाबादच्या महापालिकेत गोंधळ; तीन नगरसेवकांचे पद रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

गुरुवारी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ उडाला आहे. यात विरोधी पक्षनेते फिरोज खान यांच्यासह गंगाधर ढगे आणि जमील कादरी यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत.

गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी टीडीआरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा कडाडून विरोध केला. काही वेळाने विरोधाचे रुपांतर वादात झाले. आणि पालिकेत गोंधळ उडाला.

त्यानंतर एम आय एम पक्षातील तीन नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version