कट का मारला म्हणून एसटी बसचालकाला मारहाण

कट का मारला म्हणून एसटी बसचालकाला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

रोहा-माणगाव एसटी बस कोलाड रस्त्यावरून जात असताना एका दुचाकीला कट मारल्याचा गैरसमज करून फिल्मी स्टाइलने भर रस्त्यात एसटीसमोर दुचाकी आडवी घालून एसटीमधला जॅक काढून चालकाला मारल्याची घटना नुकतीचं घडली होती. अशीच एक घटना पैठण रोडवरील टोलनाक्यावरची दादागिरी चितेगाव टोल नाक्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत पाहण्यास मिळाली. 

पैठणहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या बसला चितेगाव टोलनाक्यावर अडवून बस चालकाला काही तरूणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. गुरुवारी दुपारच्या वेळेस घडलेल्या घटनेत दुचाकीला कट का मारला म्हणत तरुणांनी लाकडी दांड्याने ड्रायवरला मारले.

हा सर्व प्रकार चितेगाव टोल नाक्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना बिडकीन पोलिसांनी अटक केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version