झोपाळा खेळताना गळफास लागल्याने मुलाचा मृत्यू

झोपाळा खेळताना गळफास लागल्याने मुलाचा मृत्यू

 जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये  झोका खेळताना गळफास लागल्यानं एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. करण गुंजाळ असं या मुलाचं नाव आहे.

औरंगाबादमधल्या प्रकाशनगरच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडलीय. सोमवारी शाळेतून घरी आल्यानंतर करण झोका खेळण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर गेला.

झोका खेळत असताना अचानक त्याच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास लागला आणि तो बेशुद्ध पडला.

काही वेळेनंतर त्याची बहीण त्याला बोलावण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. करणला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version