खोदकाम करताना ‘त्यांना’ चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला अन्…

खोदकाम करताना ‘त्यांना’ चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या नेवरगावमध्ये खोदकाम करताना निजामकालीन चांदीच्या नाण्यांनी भरलेले मातीचा हंडा सापडला.

हा चांदी असलेला हंडा खोदकाम करणाऱ्यांनी लांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र या वाटाघाटीची चर्चा फिस्कटल्याने पोलिसांना ही माहिती कळाली.

त्यानंतर पोलिसांनी ही नाणी ताब्यात घेतली. या घटनेनंतर चांदीचे घबाड सापडल्याची चर्चा गंगापूर तालुक्यात पसरली. मातीच्या मडक्यातील सव्वा किलो वजनाची 90 चांदीची नाणी पोलीसांनी जप्त केली.

मात्र मडक्यात नेमकी किती नाणी होती हे मात्र गुलदस्त्यात आहे. गंगापूर तालुक्यातील जुने नेवरगाव येथील राम मंदिराच्या बाजूला खोदकाम करताना हे मडके सापडले. यातील चांदीची नाणी मजुरांनी आपसात वाटून घेतली. मात्र, घबाडाचे बिंग फुटून ही वार्ता पोलिसांच्या कानी पडली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version