‘हे’ गाणं गायल्यामुळे शानवर प्रेक्षकांकडून दगडफेक

‘हे’ गाणं गायल्यामुळे शानवर प्रेक्षकांकडून दगडफेक

गुवाहाटीच्या सरुसजाई स्टेडियममध्ये २९ ऑक्टोबर रोजी एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक शान याच्यावर दगडफेक करण्यात आलीय. कार्यक्रमात बंगाली गाणं गायलं म्हणून शानवर दगडफेक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात शाननं एक बंगाली गाणं गायला सुरुवात केली. अचानक तिथल्या प्रेक्षकांनी ‘हे आसाम आहे बंगाल नाही’ असं म्हणत दंगा घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शानवर काही प्रेक्षकांनी दगडफेक केली. यावर, शाननं प्रसंगावधान राखत ‘एका परफॉर्मरचा मान राखा’ असं आवाहन प्रेक्षकांना केलं.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर शाननं सोशल साईट ट्विटरवरही आपलं म्हणणं मांडलं. ‘प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये’ असं आवाहन यावेळी शाननं केलंय. त्याचबरोबर, ‘आसामचा दौरा खूपच चांगला होता… यावेळी मला अनेक नवीन मित्र भेटले’ असंही त्यानं म्हटलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version