जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
आमदार रवी राणा यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाडी परिसरात हा हल्ला झालाय. सुदैवाने यादरम्यान रवी राणा कारमध्ये नव्हते.
कार रवी राणा यांना घेण्यासाठी विमानतळावर जात होती त्यावेळी हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली.
हल्लेखोर यावेळी दुचाकीवर आले आणि राणा यांच्या कारवर दगडफेक केली. या हल्ल्यात कारचे मोठ नुकसान झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.