‘पवारांच्या घरावरील हल्ला निंदनिय’ – देवेंद्र फडणवीस

‘पवारांच्या घरावरील हल्ला निंदनिय’ – देवेंद्र फडणवीस

न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी थेट मोर्चा काढला. मात्र, आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसल्याची एकमुखी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले की, शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. तसेच गेल्या ५ महिन्यांपासून अधिक काळापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया…

तसेच, गेली पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. या सर्व परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले. शरद पवारांनी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, पवारांनी हे आश्वासन पाळले नाही त्यामुळे संतप्त कर्मचारी पवारांच्या  घरासमोर धडकले, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version