कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरवर हल्ला

कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरवर हल्ला

राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रकार सुरूच असून गोंदिया जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने एका व्यक्तीने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी येथे हा प्रकार घडला असून दिनेश मसराम असं मारहाण केलेल्या युवकाचे नाव आहे.

‘घरचे पॉझिटिव्ह असताना मी निगेटिव्ह कसा आलो?’ असं विचारत या युवकाने डॉक्टरला मारहाण केली आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version