जय महाराष्ट्र वेब न्यूज, नागपूर
बीअर पिण्याचा ग्लास मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे.
केवळ बीअर पिण्याचा ग्लास मोफत दिला नसल्यामुळे एका तरुणावर तलवारीने हल्ला करून बीअर शॉपमधील कर्मचारी हिमांशू चौरावार याला जबर जखमी केले.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.
काय घडलं नेमकं?
जयदुर्गा ले-आऊट नरेंद्रनगरमध्ये राहणारे राजू दामोदर रेड्डी यांचं अमरावती मार्गावर झिरो बीअर शॉप आहे.
तेथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास आलेल्या तीन तरुणांनी बीअर घेतली आणि स्कीमनुसार बीअरचा आणखी एक मग मागितला.
मात्र तो न दिल्यामुळे आरोपींनी रेड्डी तसेच त्यांच्या दुकानात काम करणारा चौरावार याला शिवीगाळ करून निघून गेले.
पण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर काही वेळेनंतर पाच ते सहा आरोपी तलवारीसह बीअर शॉपीमध्ये येऊन त्यांना धमकवत बीअर शॉपीत तोडफोड सुरू केली.
एकाने हिमांशू चौरावार याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. काहींनी बाहेर निघताना बीअर शॉपीवर दगडफेक केली. तोडफोड करून आरोपी पळून गेले.
रेड्डी यांनी अंबाझरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.