दादा गटातील युवक आक्रमक

दादा गटातील युवक आक्रमक

ठाणे, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचे संकेत अनेक दिवसांपूर्वी अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिले होते. त्यावेळी अनेकांनी ती गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. महिनाभरापूर्वी शरद पवारांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुध्दा राष्ट्रवादीत वातावरण चांगलेच तापले होते.

रविवारी अचानक राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. म्हणून अजित पवारांसह ज्या नेत्यांनी पक्ष सोडून मंत्रिपद स्वीकारले त्यांचा फलकावरील प्रतिमेला काळे फासले. त्याचप्रमाणे त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोला फुल्या आणि जोडे मारत निषेध केला आहे.

ठाण्यातील अजित दादा गटातील राष्ट्रवादी युवक आक्रमक झाले आहेत. रविवारी ज्या पद्धतीने अजित दादांच्या प्रतिमेस काळे फासले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवकचे वीरेंद्र वाघमारे आणि मोसिन शेख यांच्याकडून निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोला फुल्या आणि जोडे मारत केला निषेध करत फलकावर आव्हाड यांच्या खाली बंटी तर जयंत पाटील यांच्या खाली बबली असा उल्लेख करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे पेढे वाटून देखील जल्लोष देखील करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version