लवकरच भिडे आणि एकबोटे यांना अटक होईल – रामदास आठवले

लवकरच भिडे आणि एकबोटे यांना अटक होईल – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एक जानेवारीची दंगल हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप केंद्रीय मंत्री विलास आठवले यांनी आहे.

मुख्यमंत्र्याची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.  लवकरच भिडे आणि एकबोटे यांना अटक होईल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

दलित आणि मराठा हा वाद महाराष्ट्रात वाढवणं चुकीचं असल्याचे मतही आठवले यांनी व्यक्त केला.

अट्रोसिटी कायदा अजिबात रद्द होणार नाही असेही ते म्हणाले.

मी काय कागदी वाघ नाही तर, मी ढाण्या वाघ आहे असा टोलाही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

जिग्नेश जर खरा आंबेडकरवादी असेल तर त्यांन ‘जय भीम’ म्हणावं. लाल सलाम म्हणू नये.

नक्षलवादाबाबत सहानुभूती आहे मात्र नक्षलवाद मधून न्याय मिळू शकणार नाही. त्यांनी मुख्य प्रवाहात येऊन काम करावे.

नक्षलवाद्यानी निवडणूक लढवावी आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेऊ आणि निवडून देऊ. पण त्यांचा हा मार्ग चुकीचा असल्याचे आठवले म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version