म्हणून ‘त्या’नं चक्क खाल्लं स्व:तचं पुस्तक

म्हणून ‘त्या’नं चक्क खाल्लं स्व:तचं पुस्तक

वृत्तसंस्था, ब्रिटन

 

बऱ्याच लेखकांना आपण स्वतःचं पुस्तक विकताना बघितलं असेल पण ब्रिटनमधील एका लेखकांनी चक्क आपलं पुस्तकच चावून खाल्लं आहे. मॅथ्यु गुडविन असं या लेखकाचं नाव आहे. या लेखकाने न्यूज चॅनलवर लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुस्तक चावून खाल्लं.

 

ब्रिटनमधील निवडणूकीत लेबर पार्टीला 38 टक्क्यांहून कमी मतं मिळतील असा अंदाज या लेखकाने वर्तवला होता. आणि त्याहून जास्त मतं मिळाली तर मी माझं पुस्तक आवडीने खाईन असं ट्विट त्यांनी केलं होतं. पण त्यांचा अंदाज चुकला आणि लेबर पार्टीला 40.03 टक्के मतं मिळाली.

 

असं घडल्यावर लेबर पार्टीच्या नेत्यांनी त्यांना पुस्तक खाण्याचं आवाहन केल्यावर गुडविन यांनी स्काय टीव्हीवरच्या कार्यक्रमात पुस्तक खाणार असल्याचं जाहीर करुन खरचं तसं केलं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याच पुस्तकाची पानं गिळून सुद्धा टाकली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version