तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतले. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर मंत्र्यांसह, आमदार, खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावे लागले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी व्हीआयपी दर्शन घेतले तर त्यांच्या सहकाऱ्यांनी कळसाचे दर्शन घेतले. तसेच केसीआर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. पण खासदार आमदारांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.