वृत्तसंस्था, मुंबई
8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन आसुस कंपनीने भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे.
आसुस ZenFone AR असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. कॅमेरा हा फोनचे वैशिष्ट्य आहे. या फोनच्या कॅमऱ्यातून काढलेल्या फोटेंचे कोणत्याही सर्फेसवर वर्चुअल
ग्राफिक्स बनवता येवू शकते.
या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. 8GB रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा आसुस कंपनीने केला आहे.
आसुस ZenFone AR बेस्ट फिचर्स
– 128GB इंटरनल मेमरी
– 8GB रॅम
– 3D कॅमेरा लेंस
– 5.7 इंची Super AMOLED QHD (2560×1440) रिज्योलुशन डिस्प्ले
– 23 मेगापिक्सल सोनी IMX 318 सेंसर कॅमेरा
– 3300mAh क्षमतेची बॅटरी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.