वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एशियन गेम्स 2018 महिला एकेरीच्या बॅडमिंटन अंतिम फेरीत पी. व्ही सिंधु प्रवेश करणारी पहिली भारतीय ठरली. तिने जपानच्या आकाने यामागुचीचा 21-17, 15-21,21-10 असा पराभव केला.
भारताच्या सायना नेहवालला सेमी फायनलमध्ये हार पत्करावी लागली असून तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. 36 वर्षांनी भारताला बँडमिंटनमध्ये वैयक्तिक मेडल मिळाले असून भारताचा एशियन गेम्समध्ये डंका कायम आहे.
सायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या नजरा पी. व्ही. सिंधूवर लागल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.