आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात चांगलाच सामना रंगला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवन मॅन ऑफ द सीरिज ठरला.
अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले. बांग्लादेशने भारतापुढे 223 धावांचे माफक आव्हानला भारताने सडेतोड उत्तर दिले आणि ५० षटकात ७ बाद २२३ धावा करुन रोमांचक विजय मिळवला.
हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.