Ashok Kharat Case Helpline Number : घाबरू नका आणि समोर या! भोंदूबाबा अशोक खरातच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, आता तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण ६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
Ashok Kharat Case Helpline Number : घाबरू नका आणि समोर या!  भोंदूबाबा अशोक खरातच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, आता तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

 भक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे.ल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची मुदत आज संपत आहे. तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण ६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 पोलीस तपासात आणि पीडितांनी धिर धरून पुढे आल्यानंतर आणखी तीन तक्रारींची भर पडली आहे. यात प्रामुख्याने लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि विनयभंग यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा – Vasant More: वसंत मोरेंना होणार अटक? न्यायालयाने फेटाळला जामीन; काय आहे नेमंक प्रकरण? वाचा 

मात्र अनेक पीडित महिला सामाजिक भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी दोन विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जे कोणी तक्रार देतील त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. त्यामुळे पीडितांनी 9593270224 आणि 7775816389 या दोन नंबरवर तक्रार करावी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version