शेलारांचा भाजपसह त्रिपक्षीय युतीवर खुलासा

शेलारांचा भाजपसह त्रिपक्षीय युतीवर खुलासा

भाजप नेते आणि आमदारी आशिष शेलार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप युतीबाबत खुलासा केला आहे. २०१७मध्येच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारने आघाडीचा प्रस्ताव मांडला असल्याचा स्फोटक खुलासा आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, ‘भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याबाबत सर्व चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. मात्र, शिवसेनेसोबत सत्तेत युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला.

तसेच ‘२०१७ मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करण्याचा निर्णय झाला होता. तसेच राष्ट्रवादी खातेवाटपबद्दलही चर्चा झाली होती,’ असे आशिष शेलार म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीने शिवसेनासोबत आघाडी करण्यास विरोध केला. त्यामुळे त्रिपक्षीय सरकार स्थापन होऊ शकले नाही. परंतु २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच शिवसेनेसोबत युती केली.

दरम्यान, याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं काहीही घडलेले नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version