आशिष शेलारांची ‘ती’ मागणी मान्य; मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांना दिलासा

आशिष शेलारांची ‘ती’ मागणी मान्य; मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांना दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील गृहनिर्माण सोसाट्यांतील रहिवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. या सोसाट्यांना देण्यात आलेल्या वाढीव एनए टॅक्स भरण्याच्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबईतील 22 हजार गृहनिर्माण सोसायट्या आणि अन्य बांधकामांच्या जागांना वाढीव अकृषिक कर भरावा, यासाठी महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यावरून मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर होता.

त्यामुळे या नोटिसांना स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी मान्य केलीये. तसेच याबाबत बैठक आयोजिक करण्याचे निर्देशही महसूल विभागाला दिलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version