काँग्रेस नेते आशिष देशमुखांवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष देशमुखांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून काढण्यात आलंय. काँग्रेस शिस्त पालन समितीने ही कारवाई केली आहे. आशिष देशमुखांनी राहुल गांधी तसंच नाना पटोलेंविरोधात वक्तव्य केली होती. हीच वक्तव्य आशिष देशमुखांना भोवल्याची चर्चा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.