आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर?

आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर?

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. स्वपक्षीय नेत्यांवर टीका करणे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना महाग पडलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर उघडपणे टीका केल्याप्रकरणी देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर निलंबित नेता आशिष देशमुख शनिवारी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे देशमुख राष्ट्रवादीत जाणार का?, या चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिस्तपालन समितीची नेमणुक करण्यात आली होती. तसेच काँग्रेसच्या अनुशासन समितीने देशमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, त्या नोटीशीला देशमुख्यांनी उत्तर न दिल्यामुळे त्यांच्या पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

काय म्हणाले होते आशिष देशमुख ?

मोदी आडनावावरून न्यायालयाने शिक्षा केल्यानंतर राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. तसेच, मविआच्या सभेला गैरहजेरी प्रकरणी देशमुखांनी नाना पटोलेवर टीका केली. नाना पटोले हे मविआची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. तसेच राहुल गांधींची 16 एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणे हे नाना पटोलेंचे वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचा दावा आशिष देशमुखांनी केला.

मुळचे काँग्रेसचे आशिष देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, नेत्यांशी बिनसल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता काँग्रेसने आशिष देशमुख यांना निलंबित केले आहे. निलंबनानंतर देशमुख अजित पवारांची भेट घेणार आहेत, त्यामुळे देशमुख आता राष्ट्रवादीत प्रवेश करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version