‘आषाढी वारीतील व्हीआयपी दर्शन बंद’

‘आषाढी वारीतील व्हीआयपी दर्शन बंद’

सोलापूर, ०९ जून, २०२३, प्रतिनिधी :

यंदाच्या आषाढी वारीत विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना मिळणार दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह पंढरपूर मधील आषाढी वारीचा आढावा घेत विविध ठिकाणची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना “आषाढी एकादशी दिवशी व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ होणार आहे.”, अशी माहिती राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version