Asha Bhosale Health Update : आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! "आशा आहे की सर्व काही ठीक होईल" जवळच्या व्यकीने दिली ‘ही’ माहिती

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नातीने त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली आहे.
Asha Bhosale Health Update : आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! "आशा आहे की सर्व काही ठीक होईल" जवळच्या व्यकीने दिली ‘ही’ माहिती

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला असून, शनिवार, 11 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू आहेत. अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतेही निवेदन आलेले नाही. 

हेही वाचा- Asha Bhosle Admitted : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
अशातच आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मोठी माहिती दिली आहे. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांच्या तब्येतीबद्दल काही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशा भोसले यांची नात जनाई भोसले म्हणाली की, “माझी आजी, आशा भोसले, यांना तीव्र थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. उपचार सुरू आहेत आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देऊ.”

पार्श्वगायिका आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील महान आणि सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहेत. आशा भोसले यांनी 1948 साली कारकिर्दीची सुरुवात केली, चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे त्यांचे पहिले गाणे होते. आशा भोसले यांनीही 2200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. 70 वर्षांहून अधिक अनुभवासह, त्यांनी अनेक भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्यासारख्या महान संगीतकारांसोबत काम केले आहे. आशा भोसले यांनी बॉलीवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतःही संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होते आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी आणि अनोख्या गायन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी प्रतिष्ठित पद्मविभूषणसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतिक्षा केली जात आहे. तर भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार हे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचत असल्याचे समजते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version