जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
शेतकऱ्यांना कर्जमाफी नको म्हणत टीकेच्या धनी ठरलेल्या स्टेट बँक प्रमुख अरुंधती भट्टाचार्य पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. एकिकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करणाऱ्या भट्टाचार्यांनी दुसरीकडे मात्र टेलिकॉम सेक्टरकरता 4 लाख कोटी बेलआऊट पॅकेजची मागणी केली आहे.
त्यामुळे त्यांच्या या दुटप्पी भूमिकेला शेतकऱ्यांसह अनेक शेतकरी नेत्यांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. भट्टाचार्यांच्या मागणीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अरुंधती भट्टाचार्य या शेतकरी विरोधी असून त्यांचं वक्तव्य हे शेतकरी विरोधी सुनियोजित कटाचा भाग आहे. निवृत्ती झाल्यानंतर अरुंधती यांना कॉर्पोरेट घराण्यांकडे नोकरी करायची आहे. त्यामुळे त्या अशा मागण्या करतात असा आरोप शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.