छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माणसांच्या मनात व्हावं – डॉ.अरुणा ढेरे

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माणसांच्या मनात व्हावं – डॉ.अरुणा ढेरे

सर्वसामान्य माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा अनेक अंगांनी उलगडून घेण्याची गरज आहे. उद्याच्या महाराष्ट्रासाठी त्यांनी जे काही संचित देऊन ठेवलंय, ते समजून घेण्याची गरज आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायचंच असेल तर सर्वसामान्यांच्या मनात व्हावं, अशी भावना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली आहे.

यंदा प्रथमच डॉ.अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झालं. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version