अनुसुचित जातींच्या विकासासाठी 56 हजार कोटींचा निधी मंजूर – अरुण जेटली

अनुसुचित जातींच्या विकासासाठी 56 हजार कोटींचा निधी मंजूर – अरुण जेटली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

 

56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलाय. आदिवासांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळा सुरु होणार असंही ते म्हणालेत. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार असून आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी 1200 कोटींची तरतूद करण्यात आलीय. अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिलीय.

प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर विद्यालयांची स्थापना होणार पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम त्यात १००० विद्यार्थ्यांना रिसर्चची संधी मिळणार आहे.

तसेच देशातील शिक्षणावर 1 लाख कोटी खर्च करणार अशी घोषणा अरुण जेटलींनी केली.

दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती जेटलींनी दिली. नर्सरी ते 12 वी पर्यंत एकच शैक्षणिक धोरण ठेवणार असंही ते म्हणालेत…शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार अशी माहिती जेटलींनी दिली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version