बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ

बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ

बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३० मे) रात्री मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर खामगाव बायपासवर धावत्या वाहनांवर दगडफेकीची घटना ताजी असतानाच त्याच राष्ट्रीय महामार्गावर दोन हॉटेलला आग लावण्याची घटना घडली आहे. अज्ञात लोकांनी जयपुर लांडे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या दोन चहाची दुकाने तसेच पान टपऱ्या जाळून टाकल्या आहेत. दगडफेकीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा बुधवारी (दि. ३१ मे) मध्यरात्री साडेबारा वाजता अज्ञातांनी दोन टपऱ्या जाळल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version