विमानात महिलेशी गैरवर्तन करणारा अटकेत

विमानात महिलेशी गैरवर्तन करणारा अटकेत

एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानात शंकर मिश्रा या प्रवाशाने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची संतापजनक घडली नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती. त्यानंतर एअर इंडियाने मिश्रा याच्यावर ३० दिवसांची उड्डाणबंदी घातली. तसेच दिल्ली पोलीसही त्यांचा शोध घेत होते. दरम्यान दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला बंगळुरमधून अटक केली आहे.

शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. शंकर मिश्राचं शेवटचं लोकेशन बंगळुरूमध्ये सापडलं होतं. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा शोध घेण्यात आला. मात्र, मिश्रा त्याचा फोन सातत्यानं बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्या बंगळुरू पोलिसांना यश आलं आहे.

प्रकरण नेमकं काय?

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. परंतु, तो अद्याप मिळून आलेला नाही. आरोपी शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे हॉटेल आहे. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version