नाशकात वृद्धांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

नाशकात वृद्धांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

नाशकात वृद्धांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये वृद्ध व्यक्तींना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. शैलेश शिंगे असे अटक केलेल्या संशयिताच नाव आहे. याआधी देखील संशयितावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या या संशयिताला अखेर मुंबई नाका पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. आणखी काही गुन्हे देखील त्याकडून उघड होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version