राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेकी प्रकरणी आणि तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. वॉरंट परळी कोर्टाने अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

२००८ मध्ये मध्ये राज‎ ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎ पोलिसांनी चार्शीट फाईल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ जानेवारी आणि नंतर १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. पण, १२ तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती होती, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आता त्यांना असून येणाऱ्या १८ जानेवारीला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

बुधवारी सकाळी परळीत येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली होती. राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने सकाळी १० वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे आले त्यानंतर, परळी कोर्टात हजर राहिले आणि आपल्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची राज यांच्याकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. तर राज यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज ठाकरे यांची पाचशे रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version