एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार; भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा विक्रम

एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार; भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा विक्रम

वृत्तसंस्था, बंगळुरु  

 

एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार झाले आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी नवा विक्रम प्रस्थापित केला.

बंगळुरूत भारतीय लष्कराच्या जवानांनी हा विक्रम प्रस्थापित केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.

तिरंग्यातील कपडे परिधान केलेल्या जवानांचं नेतृत्व मेजर बन्नी शर्मा यांनी केलं. तर सुभेदार रामपाल यादव या जवानाने बाईक चालवण्याची जबाबदारी लिलया पेलली.

या प्रात्यक्षिकासाठी भारतीय लष्करातील 58 जवान गेल्या अनेक महिन्यांपासून याची तयारी करत होते. विशेष म्हणजे, या प्रात्यक्षिकाच्या सरावादरम्यान हे जवान केवळ बिस्किटं आणि 100 मिली पाणी इतकाच आहार घेत होते.

दरम्यान, आज प्रात्यक्षिक सादर केलेल्या टीमने आजपर्यंत एक हजार शो सादर केले आहेत. तर या टीमच्या नावावर 20 विश्विविक्रम नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी याच टीममधील 56 जवानांनी एकाच बाईकवर स्वार होण्याचा विक्रम केला होता.

तर 1982 मध्ये याच टीमने एशियाड खेळात आपली चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करुन सर्वांचीच मनं जिंकली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version