वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय वायु दलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे आज सायंकाळी ७.४७ वाजता दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते वयाच्या 98व्या वर्षात घेतला अखेरचा श्वास.
अर्जन सिंह यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि हवाईदल प्रमुख बी. एस. धनवा यांनी अर्जन सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. त्यानंतर ७.४७ वाजता अर्जन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.
अर्जन सिंग यांना वायुदलाकडून मार्शल ही पदवी दिली गेलीये. ही पदवी निवृत्तीनंतरही राहतं. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पदासारखंच हे पद आहे. अर्जन सिंह हे १९६९ साली वायुदलातून निवृत्त झाले. १९६५ च्या युद्धातल्या कामगिरीसाठी त्यांना पद्म विभूषण दिलं गेलं होतं.
अर्जन सिंह यांनी हवाईदलात सेवा बजावताना ६० वेगवेगळ्या प्रकारची विमाने हाताळली. १९६९मध्ये सेवानिवृत्त होत असतानाही त्यांच्यातील उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. ते चीफ ऑफ एअर स्टाफ असतानाच हवाईदलाच्या ताफ्यात सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि अॅसॉल्ट हेलिकॉप्टर्स दाखल झाली होती. अर्जन सिंह यांच्या ९७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाईदल तळाला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
भारत-पाकिस्तान युद्धातील योद्धा अर्जन सिंह यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १५ एप्रिल १९१९ रोजी फैसलाबादमध्ये एका सैन्य परिवारात झाला होता. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अर्जन सिंह यांनी दुसरे महायुद्ध आणि १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला. फिल्ड मार्शलच्या बरोबरीचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे एकमेव हवाईदल अधिकारी होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.