धनुष्यातून सुटलेला बाण ‘तिच्या’ हातात आरपार घुसला अन्… कोकणातील धक्कादायक प्रकार

धनुष्यातून सुटलेला बाण ‘तिच्या’ हातात आरपार घुसला अन्… कोकणातील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, चिपळुण

 

डेरवण इथं एक अजब प्रकार घडलाय. आर्चरी स्पर्धेदरम्यान, स्पर्धकानं सोडलेला बाण हा थेट तेरा वर्षीय जुई ढगे हिच्या हातात घुसला.

या अजब आणि धक्कादायक घटनेत जुई ही जखमी झालीय. बाणाचा वेग इतका होता की, स्पर्धकानं सोडलेला बाण थेट जुईच्या हातात आरपार घुसला.

महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यामानाने डेरवण इथं सब जुनियर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला सुरुवात झाली.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धेला गालबोट लागलंय. जुई ढगे ही पुण्याची नॅशनल खेळाडू असून स्पर्धा चालू असतांना मैदानाच्या बाहेरून जातांना हा प्रकार घडला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version